झाइडर झी
झाइडर झी : ( दक्षिणेकडील समुद्र). नेदर्लंड्सच्या उत्तर किनाऱ्यावरून आत दक्षिणेकडे शिरलेले उत्तर समुद्राचे एक आखात. क्षेत्रफळ सु. ३,७०४ चौ.किमी. याच्या शाखा फ्रीझ्लँड, ओव्हराइसल, गेल्डरलँड, उत्रेक्त व नूर्ड हॉलंड ह्या नेदर्लंड्सच्या जिल्ह्यांत खोलवर शिरल्या आहेत.